Innovation
Kunal Patil
भारताच्या ‘क्विक कॉमर्स’ युगात जेव्हा अन्न, किराणा आणि दैनंदिन वस्तू काही मिनिटांत घरी पोहोचू लागल्या, तेव्हा एकच क्षेत्र मागे पडलेलं दिसत होतं ते म्हणजे घरकाम सेवा. इथेच आयुष अगरवाल या तरुणाला गवसली नवीन संधी आणि इथूनच जन्म झाला Snabbit या वेगवान, तंत्रज्ञानाधारित होम-सर्व्हिस प्लॅटफॉर्मचा.
2024 मध्ये Zepto मधील वरिष्ठ पद सांभाळणारे आयुष अगरवाल मुंबईत राहात असताना एका वैयक्तिक त्रासाला रोज सामोरे जात होते. त्यांना विश्वासार्ह, तात्काळ घरकाम मदत मिळत नव्हती. ऑनलाइन फूड किंवा किराणा काही मिनिटांत येत होतं, पण एका विश्वासार्ह क्लिनिंग हेल्पसाठी तासन्तास वाट पाहावी लागत होती. त्यांना जाणवलं भारताच्या घरकाम क्षेत्राला तंत्रज्ञान, वेग आणि विश्वासाची मोठी गरज आहे.
या वैयक्तिक वेदना-बिंदूपासूनच अगरवालांनी एका विशाल बाजार संधीची ओळख पटवली. देशातील घरकाम सहाय्यक बाजार असंघटित, अनौपचारिक आणि पूर्णपणे विश्वासावर आधारित होता. त्यांनी ठरवलं घरकाम सेवांना क्विक-कॉमर्सचा वेग द्यायचा.
Snabbit ने तयार केलं एक अॅप, जे क्लिनिंग, डिशवॉशिंग, लॉन्ड्रीसारख्या सेवांसाठी प्रशिक्षित तज्ञांना काही मिनिटांत ग्राहकांपर्यंत पोहोचवते.
परंतु Snabbit फक्त ग्राहकांसाठी नाही तर त्यांचा भर सेवा तज्ञांच्या सन्मान आणि सक्षमीकरणावर देखील आहे.
कंपनीत काम करणाऱ्या विशेतः महिला महिला कर्मचाऱ्यांसाठी सखोल प्रशिक्षण, युनिफॉर्म आणि प्रोफेशनल ओळख, बाजारापेक्षा अधिक वेतन आणि आर्थिक स्वावलंबनाच्या संधी उपलब्ध करून देत आहे.
ग्राहकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत Snabbit ने SOS बटण, पारदर्शक प्रक्रिया आणि विश्वसनीय पडताळणी प्रणाली लागू केली आहे, ज्यामुळे दोन्ही बाजूंना सुरक्षितता आणि विश्वास मिळतो.
आज Snabbit केवळ होम-सर्व्हिस नवकल्पना नसून, गृहकर्मचारी क्षेत्राचे व्यवस्थितीकरण आणि महिलांना दर्जेदार रोजगार देण्याची चळवळ बनली आहे.