Home Editor's Picksआजीच्या हातची चव आणि D2C जागतिक ब्रँड

आजीच्या हातची चव आणि D2C जागतिक ब्रँड Premium

by Editorial Team
A+A-
Reset

घरापासून दूर राहताना सर्वात जास्त आठवण कोणती येते? बहुतेकांसाठी उत्तर एकच आज्जी किंवा हातचा खमंग, घरगुती स्वाद. हाच स्वाद जगभर पोहोचवण्याच्या स्वप्नातून 2015 मध्ये जन्म झाला स्वीट कारम कॉफी’ (sweet karam coffee) या अनोख्या स्टार्टअपचा. संस्थापक आनंद भारद्वाज आणि नलिनी पार्थीबन यांनी आपल्या आज्जी जानकी पाटी (आज्जी) यांच्या पारंपरिक रेसिपींमधून प्रेरणा घेत ही कंपनी फक्त ₹2,000 च्या गुंतवणुकीत सुरू केली.

सुरुवातीची दिवस अगदी साधे होते. एक लहानसं घरगुती किचन, कुटुंबातील प्रत्येक सदस्य मदतीला, आणि स्थानिक ऑर्डर्स हाताळणारा छोटासा व्यवसाय. पण जिथे चव आणि भावना एकमेकांशी जोडलेल्या असतात, तिथे प्रत्येक पदार्थ प्रेमाने ओथंबलेला असतो. लवकरच या घरगुती टीमने उत्पादनांची श्रेणी वाढवत पारंपरिक स्नॅक्स, मिठाई, फिल्टर कॉफी, रेडी-मिक्स जेवण अशा अनेक दक्षिण भारतीय पदार्थांचा समावेश केला.

 ‘स्वीट कारम कॉफी’चा मोठा टप्पा तेव्हा आला जेव्हा त्यांनी D2C मॉडेल स्वीकारले. त्यांच्या वेबसाइट आणि अॅपमुळे ब्रँडला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड गती मिळाली. आज 32 देशांतील 1,00,000+ ग्राहकांपर्यंत हा ब्रँड पोहोचला आहे. 2020 पासून कंपनीचा महसूल दरवर्षी दुपटीने वाढत आहे. ही वाढ पाहता Fireside Ventures कडून कंपनीने नुकतेच $1.5 मिलियनचा निधी उभारला असून आता ऑफलाइन स्टोअर्स, B2B संधी आणि नवीन प्रदेशांमध्ये विस्तार करण्याची तयारी सुरू आहे.

पुढील पाच वर्षांत ‘स्वीट कारम कॉफी’ चे उद्दिष्ट पॅन-इंडिया उपस्थिती आणि जागतिक विस्तार आहे. क्विक कॉमर्स, रिटेल चॅनेल्स आणि…

related posts

Leave a Comment