Home EcosystemWomen in Leadershipएका स्त्रीची जिद्द आणि भारताचा लक्झरी आयुर्वेद ब्रँड : फॉरेस्ट इसेन्शिअल्स

एका स्त्रीची जिद्द आणि भारताचा लक्झरी आयुर्वेद ब्रँड : फॉरेस्ट इसेन्शिअल्स

by Editorial Team
A+A-
Reset

UNSTOPPABLE | Vijayalaxmi Sane


सोनेरी अक्षरात झळकणारे ‘Forest Essentials’ हे नावच एक लक्झरिअस अनुभव देऊन जातो. पण या भव्य ब्रँडच्या मागे आहे संघर्ष, धैर्य आणि सातत्य. जीवनाने दिलेल्या आव्हानांना निर्भयपणे सामोरे गेलेल्या मिरा कुलकर्णी यांची कथा म्हणजेच हा अब्जावधींचा जागतिक लक्झरी आयुर्वेद ब्रँड आहे, पण त्याची सुरुवात एका छोट्या गॅरेजमध्ये झाली होती.

मिरांचे बालपण दिल्ली, शिमला आणि मद्रासमध्ये गेले. लहानपानापासून घरी आयुर्वेद आणि निसर्गमय होते. पुढे लग्नाच्या काही वर्षांतच आर्थिक संकटे आणि पतीच्या व्यसनामुळे आयुष्य विस्कटले. फक्त २८ व्या वर्षी दोन मुलांसह त्या संसारातून बाहेर पडल्या. नोकरीचा अनुभव किंवा मोठी बचत काहीच नसताना त्यांनी घराचा अर्धा भाग भाड्याने देऊन नव्याने सुरुवात केली.

१९९९ मध्ये एका सुट्टीत मेणबत्त्या वितळवून त्या नव्या रूपात पुन्हा बनवण्याची कल्पना त्यांना सुचली. हीच ‘कँडलमॅनिया’ ठरली फॉरेस्ट इसेन्शियल्स ची पहिली पायरी. २००० मध्ये त्यांनी २ लाखांची गुंतवणूक आणि दोन कर्मचाऱ्यांसह गॅरेजमध्ये साबण आणि मेणबत्त्या बनवायला सुरुवात केली. पुढे त्यांनी ऋषिकेश येथील वैद्यांकडून आयुर्वेदिक फॉर्म्युले शोधले. महाग असले तरी शुद्धतेशी तडजोड करायची नाही, हा त्यांचा नियम. त्यांनी उत्पादने प्रभावीच नव्हे तर आनंददायी, सुगंधी, सौंदर्यपूर्ण असावीत असा विचार केला. पारंपरिक प्रक्रियेने, वैदिक मंत्रोच्चारांसह तयार केलेली उत्पादने ग्राहकांना भुरळ घालू लागली. दिल्लीच्या Khan Market मधील पहिले स्टोअर अवघ्या काही महिन्यांतच हिट झाले. यानंतर त्यांनी ने स्वतःची स्टोअर-चेन उभारण्याचा निर्णय घेतला.

आज ‘ फॉरेस्ट इसेन्शियल्स’ चे ११०+ स्टोअर्स, १४० स्पाज, ३०० हॉटेल्स आणि ९८ देशांत वितरण आहे. Taj आणि Hyatt सारख्या प्रतिष्ठित हॉटेल्ससोबत ते कार्य करतात. महिलांना रोजगार देऊन आर्थिक स्वावलंबन देणे ही ब्रँडची मोठी सामाजिक ओळख आहे.

 आपल्या एका मुलाखतीत मिरा कुलकर्णी यांनी यशाचा कानमंत्र देताना सांगितले कि,

 “कधीही हार मानू नका. तुमची इच्छा पुरेशी असेल तर काहीही शक्य आहे. ‘फॉरेस्ट इसेन्शियल्स’ हे त्याचेच जिवंत उदाहरण आहे.

related posts

Leave a Comment