Home EcosystemThe Bharat Opportunityऑफिस बॉय ते CEO: बीडच्या दादासाहेब भगत यांनी उभारलं भारताचं स्वतःचं ‘Canva’

ऑफिस बॉय ते CEO: बीडच्या दादासाहेब भगत यांनी उभारलं भारताचं स्वतःचं ‘Canva’

by Editorial Team
A+A-
Reset

DESI FUNDA | Amit Mhatre


बीड जिल्ह्यातील एका छोट्या खेड्यात दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या दादासाहेब भगत यांनी देशाच्या डिझाईन-टेक क्षेत्रात इतकं मोठं स्थान मिळवले ज्याची कुणी कल्पना देखील केली नसेल. पण त्यांची कहाणी सिद्ध करते की परिस्थिती नाही, तर जिद्द आणि स्वप्नांची उंची माणसाला पुढे नेत असते.

मोठी स्वप्ने मनात घेऊन दादासाहेब पुण्यात आले. उपजीविकेसाठी त्यांनी इन्फोसिस मध्ये फक्त ₹4,000–₹9,000 पगारावर ऑफिस बॉय म्हणून काम सुरू केले. दिवसभर ऑफिस स्वच्छता, फाइल्स ने-आण अशी साधी कामे करावी लागत होती. आणि रात्री ते स्वतःचं भविष्य घडवत होते. मोफत ऑनलाइन व्हिडिओ पाहत ते ग्राफिक डिझाईन, कोडिंग आणि डिजिटल कौशल्ये शिकू लागले. भगत यांना भारताचे स्वतःचे “Canva सारखं प्लॅटफॉर्म बनवायचे होते. त्यांचे हे स्वप्न ऐकून काही लोक त्यांची टिंगल पण करायचे. पण दादासाहेबांनी हार मानली नाही.

ना मोठी पदवी, ना मोठं नेटवर्क, ना गुंतवणूक फक्त मेहनत, दृष्टी आणि कौशल्याचा पाठपुरावा करत भगत यांनी DooGraphics / DesignTemplate.io भारताचं स्वतःचं डिझाइन प्लॅटफॉर्म उभं केलं. हे प्लॅटफॉर्म आज Canva सारख्या जागतिक ब्रँडला टक्कर देत आहे.

या प्लॅटफॉर्मने हजारो विद्यार्थी, क्रिएटर्स, फ्रीलान्सर्स आणि छोटे उद्योजक यांना सोपं, स्वस्त आणि व्यावसायिक डिजाईनिंगचं साधन उपलब्ध करून दिलं. सध्या ते एक यशस्वी CEO आहेत. दादासाहेब भगत यांची ही यशोगाथा युवा वर्गासाठी प्रेरणादायी आहे.

related posts

Leave a Comment