जगभरात sneakers (बूट) ही फक्त फॅशन नसून एक संस्कृती मानली जाते. पण या जागतिक sneaker culture मध्ये भारताचे प्रतिनिधित्व कुठेच दिसत नव्हते. नोकरीनिमित्त ऑस्ट्रेलियात राहणारे अर्जुन सिंग जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांना हि बाब प्रकर्षाने जाणवली. भारतात देखील परदेशी ब्रॅण्डची मोठी चालती होती. पण स्वदेशी स्नीकर्सचा कुठेच पत्ता नव्हता. परदेशात राहाताना त्यांना जाणवलं की जगातील मोठी ब्रँड्स आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगून डिझाइन करतात; मात्र भारतासाठी असे कोणतेही sneakers नव्हते जे “आपले” वाटतील.
यातूनच Gully Labs ची बीजं रोवली गेली. एक असा ब्रँड जो भारतीय कथा, रंग, संस्कृती आणि कारागिरी यांना sneaker design च्या माध्यमातून जगासमोर आणेल. अर्जुन यांनी आपल्या वेबसाइटवर एक साधा “मॅनिफेस्टो” लिहून सुरुवात केली. या कल्पनेभोवती समर्थक जमा झाले आणि त्यांच्यातच नंतर अनिमेष मिश्रा सामील झाले, ज्यांनी Bain मधील नोकरी सोडून या संकल्पनेला प्रत्यक्ष स्टार्टअपचे रूप दिले.
Gully Labs “Made in India” पेक्षा पुढे जातं ते ‘emotionally owned by India’ बनले. हे होते भारतासाठी, भारताने, भारताचं प्रतिनिधित्व करणारे sneakers. एका छोट्या वर्कशॉपमधून प्रोटोटाइप्स बनवणाऱ्या या ब्रँडने कमी वेळात मोठी कमाई केली, गुंतवणूक मिळवली आणि दिल्लीतील पहिलं फ्लॅगशिप स्टोअर उघडलं. हे स्टोअर फक्त रिटेल स्पेस नाही; ते एक कम्युनिटी-सेंटर, कारागिरांसाठी कार्यशाळा, आणि स्टोरी गॅलरी आहे.
Gully Labs आज भारतीय स्नीकर्सना ग्लोबल स्टँडर्डवर नेण्याबरोबरच, भारताच्या अस्सल ओळखीला डिझाइनच्या माध्यमातून नवीन रूप देत आहे.
स्टार्टअप म्हणजे काय?
सध्या स्टार्टअप हा उत्पन्नाचा एक नवीन आणि महत्त्वपूर्ण पर्याय बनत आहे. तरुण पिढी नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय उभारण्याकडे अधिक आकर्षित होत आहेत. स्टार्टअप म्हणजे एखादी नवीन, नाविन्यपूर्ण कल्पना घेऊन सुरू केलेला व्यवसाय. पारंपरिक व्यवसायांपेक्षा स्टार्टअप वेगळे असतात. एखादी समस्या सोडवण्यासाठी किंवा गरज भागवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान, नवी सेवा किंवा वेगळे व्यावसायिक मॉडेल वापरून स्टार्टअप सुरु केलं जाते. स्टार्टअपचा मुख्य उद्देश कमी वेळेत वेगाने वाढ करणे (growth) हा असतो. बहुतेक स्टार्टअप सुरुवातीला लहान प्रमाणात सुरू होतात आणि भांडवलाची गरज भागवण्यासाठी स्वतःची गुंतवणूक, बँक कर्ज किंवा गुंतवणूकदारांकडून निधी घेतात. जोखीम जास्त असली तरी यश मिळाल्यास मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकास घडतो. आज डिजिटल युगात अॅप्स, ई-कॉमर्स, शिक्षण, आरोग्य, शेती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक स्टार्टअप सुरू झाले आहेत. भारत सरकारनेही “Startup India” उपक्रमाद्वारे स्टार्टअप संस्कृतीला चालना दिली आहे.