YOUTHFUL
Deepa Pillay
भारतातील फिटनेस उद्योगात नवी क्रांती घडवणाऱ्या Cult.fit ची सुरुवात अत्यंत साध्या स्वरूपात झाली होती. २०१५ मध्ये बेंगळुरूमध्ये दीपक पोडुवाल आणि ऋषभ तेलंग यांनी “Cure” नावाने एक अनोखा, ‘मशीन फ्री फिटनेस’ संकल्पनेवर आधारित जिम सुरू केला. बॉडीवेट ट्रेनिंग, फंक्शनल वर्कआउट्स आणि ग्रुप सेशन्सवर भर देणारा हा मॉडेल तरुणांमध्ये खूप लवकर लोकप्रिय झाला.
या वाढीची दखल घेत Mukesh Bansal आणि Ankit Nagori यांनी २०१६ मध्ये Cure ला सुमारे ₹20 कोटींना विकत घेतले. आणि त्याला त्यांच्या व्यापक प्रिव्हेंटिव्ह हेल्थकेअर प्लॅटफॉर्म Cult.fit मध्ये समाविष्ट केले. या क्षणापासून Cult ची वाटचाल पूर्णपणे बदलली. Cult.fit चे उद्दिष्ट होते, फिटनेस, पोषण, मानसिक आरोग्य आणि वैद्यकीय मार्गदर्शन यांना एकाच डिजिटल इकोसिस्टममध्ये आणणे.
अधिग्रहणानंतर Cult ने देशभर जलदगतीने विस्तार केला. झुंबा, HRX वर्कआउट्स, बॉक्सिंग, S&C, योगा अशा विविध सेशन्समुळे Cult फिटनेस सेंटर हा फक्त जिम नसून एक्सपीरिअन्स बेस्ड फिटनेस डेस्टिनेशन बनला. त्यांच्या अॅपने वर्कआउट ट्रॅकिंग, ऑन-डिमांड व्हिडिओ सेशन्स आणि पर्सनलाइज्ड प्लॅन्सद्वारे डिजिटल फिटनेसला नवे रूप दिले.
कोविड-१९ काळ Cult.fit साठी निर्णायक ठरला. जिम बंद असतानाही कंपनीने Cult Live हे ऑनलाइन वर्कआउट प्लॅटफॉर्म लॉंच केले. लाखो लोकांनी घरबसल्या फिटनेस स्वीकारल्याने त्यांचा यूजर बेस प्रचंड वाढला, आणि डिजिटल फिटनेस Cult च्या वाढीचा मुख्य आधार बनला.
यानंतर कंपनीने डाएट (Eat.fit), मेंटल वेलनेस (Mind.fit) आणि विविध फिटनेस स्टार्टअप्सची खरेदी करून आपला इकोसिस्टम अधिक व्यापक केला.
मोठ्या गुंतवणूकदारांचा पाठिंबा, देशव्यापी विस्तार आणि टेक-इंटिग्रेटेड मॉडेल यांच्या जोरावर Cult.fit चे मूल्यांकन अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडत भारताचे पहिलं फिटनेस युनिकॉर्न बनले. मशीन-फ्री जिमपासून सुरू झालेली ही यात्रा आज भारतीय फिटनेस उद्योगातील सर्वात प्रभावी कहाणी ठरली आहे.